जेव्हा एखादा उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रारंभ करतो, तेव्हा सर्वात मोठी अडचण त्यांना सामोरे जावी लागते. ती म्हणजे स्त्रोत (sources) . एकतर दिशाभूल करून किंवा कोणाकडून काही सूचना मिळाल्याने उमेदवार चुकीच्या दिशेने जाण्याची दाट शक्यता असते. ब-याचदा, आपण संपूर्ण पुस्तक वाचून, त्याच्या नोंदी काढतो, सुधारित करतो अगदी पाठपण करतो तेव्हा आपल्याला कळते की परीक्षेसाठी त्या पुस्तकाची अजिबात गरज नव्हती. त्यानंतर येणारी निराशाजनक भावना आपण सर्वांनी अनुभवलेली आहे
एकीकडे तयारीची महत्त्वाची वर्षे वाया जातात आणि दुसरीकडे वय वाढते . आणि जसजसे वय वाढते तसतशी नकारात्मकता वाढते आणि उमेदवारांची विश्लेषण आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.हा सर्वसामान्य आणि सर्वमान्य अनुभव आहे.
या समस्या टाळण्यासाठी, आम्ही NCERTs, मानक पुस्तके (standard books) , वेबसाइट्स आणि google ड्राइव्ह सारख्या इतर स्त्रोतांसह स्त्रोत सूची (sources list) जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून महत्त्वाच्या आणि संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येकाचा मौल्यवान वेळ आणि शक्ती वाचेल.
आम्ही सर्व उमेदवारांना विनंती करतो की, विषय आणि त्यातील घटक समजून घेण्यासाठी आणि नोट्स बनवण्यासाठी या P-IAS ASTRA (अस्त्र) बुकलेटमधून जावे. हे सर्व स्त्रोत आम्ही उमेदवारांसाठी परिश्रमपूर्वक संकलित केले आहेत आणि ते पूर्णपणे विनामूल्य आहेत जेणेकरून भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवार या स्त्रोतांचा वापर करू शकेल.
या लेखाची समाप्ती करताना, आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की कशाचीही काळजी करू नका!! या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपल्या सुचना ,नवीन मागण्या आम्हाला support@pitambareias.in वर मोकळ्या मनाने लिहा.
स्त्रोत सूची डाउनलोड करण्यासाठी विषयांवर क्लिक करा
P -IAS चे नवीन उपक्रम आणि घडामोडींच्या माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जुळा
(16) Comments