COACHING CLASS आणि LECTURES ची आता खरोखरच गरज उरली आहे का?

Print Friendly, PDF & Email

MPSC चा बदललेला अभ्यासक्रम आणि MPSC आणि UPSC या दोन्हींचे वर्णनात्मक स्वरूप यामुळे परीक्षेची मागणी पूर्णतः बदलली आहे. आता परीक्षेला सादरीकरण कौशल्यासोबत(presentation skills), विश्लेषणात्मक क्षमता( analytical ability), संकल्पनात्मक स्पष्टता (conceptual clarity) आवश्यक आहे. तुमचा पेपर तपासणाऱ्या परीक्षकावर तुमची स्वतःची छाप पाडण्यासाठी या मूलभूत गोष्टी आता किमान निकष (minimum criteria) आहेत.

येथे, महत्वाचा प्रश्न हा आहे, कि ,या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला औपचारिक LECTURES ची आवश्यकता आहे का? LECTURES साठी कष्टाने कमावलेले हजारो रुपये खर्च करण्याची आता काही गरज राहिली आहे का? अनेक संस्था आता नक्कीच तुम्हाला त्यांच्या विविध तंत्रांनी आकर्षित करत असतील. गोंधळलेला प्राणी शिकारीसाठी सर्वात सोपा शिकार आहे !! त्याच पद्धतीने जर तुम्ही आता गोंधळला असाल तर शिकारी नक्कीच तुमची वाट पाहत आहेत !!!

आमच्या समज आणि अनुभवानुसार, उमेदवाराला आता व्याख्यानांच्या ऐवजी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि बहुतेक “बाजार” विद्यार्थ्यांना लेक्चर देण्याच्या शर्यतीत आहे. त्याऐवजी 100 तासांच्या व्याख्यानांपेक्षा एक मार्गदर्शक अधिक उपयुक्त आहे.

मग आता प्रश्न येतो कि अभ्यासाचा दृष्टिकोन काय असावा?? आणि अभ्यास कसा करावा???

• आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्याख्यानांमध्ये शेकडो तास आणि तुमची मौल्यवान ऊर्जा वाया घालवू नका. त्याऐवजी, NCERTs आणि इतर मूलभूत पुस्तके (Basic books) वाचण्यात आपला वेळ घालवा आणि आपल्या मूलभूत संकल्पना (BASIC CONCEPTS) तयार करा. काय वाचावे आणि काय नाही यासाठी आमच्या अस्त्र या मोफत उपक्रमाचा फायदा घ्या. (आपण स्त्रोत सूची येथे डाउनलोड करू शकता)

• ती पुस्तके वाचताना तुम्हाला ज्या काही समस्यांना सामोरे जावे लागते, तुम्हाला ज्या काही concepts कमकुवत वाटतात, फक्त त्या गुगल करा किंवा त्यावर Youtube व्हिडिओ पहा. Youtube वर हजारो तासांचे मोफत lectures आहेत. आम्हाला खात्री आहे की तुमची प्रत्येक शंका या मार्गाने दूर होईल.

• तुमच्या concepts तयार केल्यानंतर, (ज्यात तुमच्या व्याख्यानाच्या तासांऐवजी फक्त 10% वेळ लागेल) फक्त त्या विषयावरील MCQ सोडवा आणि त्या विषयावर,topics वर उत्तरे लिहायला सुरुवात करा. (तुम्ही तपस्या 2023 डोळे झाकून follow करू शकता – हा आमचा विनामूल्य उत्तर लेखन उपक्रम आहे)

अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जमेच्या बाजूंची आणि कमकुवत टॉपिक ची स्पष्ट कल्पना मिळेल. यानंतर तुम्ही त्यानुसार तुमचा approach ठरवू शकतात. (अधिक माहिती आम्ही website वर words of wisdom (wow blog) मध्ये update करु).

आणि तरीही तो प्रश्न सुटत नसेल, तर थेट आम्हाला +91 9710071111 वर कॉल करा. कशाचीही काळजी करू नका!!! आम्ही तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहोत. आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.

ही परीक्षा तुमचे  सातत्य, योग्य दृष्टीकोन आणि दिशा याबद्दल आहे.तुमच्या बाजूने, तुम्ही सातत्य बाळगण्याची काळजी घ्या, आमच्या बाजूने, आम्ही तुम्हाला दृष्टीकोन आणि दिशा दाखवु.

अशाप्रकारे, आपण आपले समान ध्येय गाठू, ते म्हणजे या प्रयत्नात तुम्हाला अधिकारी बनवणे!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

The maximum upload file size: 256 MB. You can upload: image, audio, video, document, spreadsheet, interactive, text, archive, code, other. Links to YouTube, Facebook, Twitter and other services inserted in the comment text will be automatically embedded. Drop file here